संगमनेर :- लोकसभा निवडणूक झाल्यानंतरही नगर जिल्ह्यात विखे Vs थोरात समर्थकांतील वाद थांबण्या एवजी वाढत चालले आहेत.
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार नगरमधील नवनिर्वाचित खासदार सुजय विखे यांच्या अभिनंदनाचे बॅनर फाडण्यात आले आहेत.
विखेंचे कट्टर राजकीय विरोधक असलेले बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघात हा प्रकार घडला आहे. यामुळे संगमनेरमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुजय विखे आणि शिर्डीतील खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आले होते.
त्या बॅनरवर ‘आता कोण रोखणार हे वादळ’ असे लिहले होते. अज्ञात व्यक्तींनी हे बॅनर फाडून टाकले आहेत. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे पाटील व खासदार सदाशिव लोखंडे पांचे छायाचित्र असलेले फलक फाडल्याने नाशिक – पुणे महामार्गावर कार्यकर्त्यांनी आंदोलन केले,
संगमनेर शहरानजीक असलेल्या घुलेवाडीत डॉ. सुजय विखे पाटील व खासदार सदाशिव लोखंडे यांचे छायाचित्र असलेले फलक लावण्यात आले होते.
हे फलक सोमवारी मध्यरात्री अज्ञातांनी फाडले. या घटनेचा शिवसेना – भाजप कार्यकर्त्यांनी निषेध केला. कार्यकर्त्यांनी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नाशिक – पुणे महामार्ग रोखून धरत रास्ता रोको आंदोलन केले.
यावेळी शिवसेना – भाजप कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते, फलक फाडणारयांचा पोलिसांनी शोध घेत त्यांना अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान या प्रकरणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यां राजश्री राजाराम वाकचौरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.