शिक्षिकेच्या गळ्यातील गंठण लांबविले !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

संगमनेर : शहरातील पार्श्वनाथ गल्ली येथील राखी महेश कासट या शिक्षिकेच्या गळ्यातील तीन तोळे सोन्याचे गंठन ओरबडून अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकलीवरून धूमस्टाईलने पोबारा केल्याची घटना स्वामी समर्थ मंदिराजवळ शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी दुपारी पावणेएक वाजेच्या सुमारास घडली आहे.

त्यामुळे महिलांमध्ये भूतीचे वातावरण पसरले आहे. एकूण ६६ हजार रुपये किंमतीचे हे गंठन होते. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील पार्श्वनाथ गल्लीत राहणाऱ्या शिक्षिका राखी कासट या शुक्रवारी दुपारी पावणेएक वाजेच्या सुमारास स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. त्याच दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकलवर येवून त्यांच्या गळ्यातील तीन तोळे सोन्याचे गंठन ओरबडून धूमस्टाईलने पोबारा केला.

यावेळी कासट यांनी आरडाओरड केली,पण तोपर्यंत चोरटे दिसेनासे झाले होते. एकूण ६६ हजार रुपये किंमतीचे हे सोन्याचे गंठन होते. याप्रकरणी राखी कासट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गु. र. नं. ६९६/२०१९ नुसार भा. दं. वि. कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24