अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संगमनेर तालुक्यातील निंबाळे परिसरात राहणाऱ्या एका २१ वर्ष वयाच्या तरुणीस आरोपी रमजान इब्राहीम पठाण , रा . तळेगाव , ता . संगमनेर याने फोन करुन फोनवर लज्जा उत्पन्न होईल , असे बोलून तरुणीच्या घरी कोणी नसताना घरात घुसून तिला धरुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन विनयभंग केला.
४ जानेवारी ते ५ जानेवारी दरम्यान हा प्रकार घडला . पिडीत तरुणीने काल संगमनेर शहर पोलिसांत तक्रार दिल्यावरुन आरोपी रमजान इब्राहीम पठाण याच्याविरुद्ध भादवि कलम ४५२ , ३५४ , ३५४ ड , ( २ ) प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.