मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेत किंग मेकर ची भूमिका बजावल्यानंतर आता संजय राऊत यांनी आपला मोर्चा गोव्याकडे वळवला आहे. भाजप ला संपवण्यासाठी संजय राऊत आता मैदानात उतरले आहेत.
आता गोव्यात राजकीय भूकंप घडेल, असा इशारा संजय राऊतयांनी भाजपला दिला आहे. गोव्यात सध्या भाजपच्या नेतृत्त्वात प्रमोद सावंत यांचं सरकार आहे.
हे सरकार उलथवून टाकणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. लवकरच गोमंतक पार्टीसोबत हातमिळवणी करुन आम्ही गोव्यात सरकार स्थापन करु, असं संजय राऊत म्हणाले.
आता हळूहळू प्रत्येक ठिकाणी आमचंच सरकार येईल, असे भाकीत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. “गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई आणि 3 अन्य आमदार हे शिवसेनेसोबत युती करत आहेत.
गोव्यात नवी युती आकाराला येईल. जे महाराष्ट्रात घडलं, ते गोव्यात घडेल. गोव्यात लवकरच चमत्कार घडेल”, असं संजय राऊत म्हणाले.