मुंबई :- महाराष्ट्रात एक मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला. आज (शनिवारी) सकाळी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली.
यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.
“संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली. पाठीत खंजीर खुपसला ही भाषा संजय राऊतांच्या तोंडी शोभत नाही. त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
संजय राऊत यांनी शिवसेनेची वाट लावली. आता तरी बोलणं बंद कर ना बाबा, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना टोला लगावला.
संजय राऊत यांनी शिवसेनेची वाट लावली. आम्ही त्यांना सांगणारे कोण, आम्ही त्यांना सुचना करतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.