Sanyogeetaraje : छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीताराजे यांनी एक आरोप केला आहे. यामुळे राज्यात चर्चा सुरू झाली आहे. नाशिकच्या काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी मज्जाव केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांनी म्हटले आहे की, नाशिकमध्ये काळा राम मंदिरात महा मृत्युंजय मंत्राचा जप बिनदिक्कत करू शकले.
नाशिकच्या काळा राम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे विरोध केला. अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला.
ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणुन त्यांनी प्रश्न केलाच. तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले.
या प्रसंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही? याबाबत संयोगीताराजे छत्रपती यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी हा अनुभव लिहिला आहे. नाशिकमध्ये महंतांनी आपल्याला वेदोक्त मंत्र म्हणून दिले नाहीत असा आरोप केला आहे.
यामुळे आता वातावरण चांगलेच तापले आहे. अनेकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे आता यावर सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.