अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महिलांची छेड का काढतो, असा जाब विचारल्याच्या रागातून पारधी समाजातील तरूणाने महिला सरपंचाच्या पतीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.
ही घटना बारामती तालुक्यातील सोनगांवात बुधवारी (१५ जानेवारी) दुपारी दोनच्या सुमारास गावातील सोनेश्वर मंदिरालगत घडली.
तालुक्यातील सोनगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री थोरात यांचे पती युवराज आबासाहेब थोरात (वय ५०) यांचा किरकोळ कारणावरून तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून खून करण्यात आला.
संतप्त जमावाने गावातील पारधी समाजाची दहा ते बारा घरे पेटवली आहेत. तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलीस चौकशी करत आहेत.
या हल्यात थोरात हे जागीच ठार झाले. पारधी समाजातील तरूणाने हत्या केल्यामुळे गावात खळबळ उडाली असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच आरोपीला अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी मागणी केली असून, परिस्थिती तणावपूर्ण आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.