अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या लागलेल्या निकालामध्ये आपल्या श्रीगोंदा तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले त्यात अजय दत्तात्रय शिंदे यांची उपजिल्हाधिकारी , कु प्रतीक्षा नामदेव खेतमाळीस यांची पोलीस उपअधीक्षक व नरेंद्र दत्तात्रय शिंदे
यांची नायब तहसीलदार पदी निवड झाल्याबद्दल मुलांच्या आई वडिलांनसह तालुक्याचे अप्पर तहसीलदार चारुशीला पवार, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव साहेब , नायब तहसीलदार डॉ योगिता ढोले व पत्रकार संजय काटे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व केशर आंब्याचे रोप देऊन सत्कार करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाधिकारी अजय शिंदे म्हटले की जिद्द ,चिकाटी व आई वडील यांचे कष्ट डोळ्यासमोर ठेऊन मी नेहमी अभ्यास करत मी हे यश संपादन केले तर पोलीस उपअधीक्षक म्हणून निवड झालेल्या
प्रतीक्षा खेतमाळीस म्हटल्या कोणत्याही मार्गदर्शना शिवाय मी हे यश संपादन केले यात माझ्या आई वडिलांचा खुप महत्वाचा वाटा आहे परंतु मी याच पोस्ट न थांबता मला अजून पुढे जाण्याची इच्छा आहे असे बोलून दाखविले
तर नायब तहसीलदार झालेले नरेंद्र म्हटले मला 12 वी च्या परीक्षेत मार्क कमी मिळाले म्हणून आता काय करावे हा विचार करत असताना मोठा भाऊ स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता म्हणून त्याच्यासोबत मीही तयारी चालू केली आणि आज मी नायब तहसीलदार म्हणून समोर उभा आहे.
यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम केलेल्या अधिकारी व पत्रकार यांचाही सन्मान “साथ” फाउंडेशन च्या वतीने करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती काँग्रेस कमिटी चे तालुका अध्यक्ष दिपक पाटील भोसले , नागवडे कारखान्याचे संचालक सुभाष काका शिंदे, सरपंच महानंदा फुलसिंग मांडे,
सामाजिक कार्यकर्त्या संगीता भोंग,सेवा संस्थेचे मा चेअरमन वसंतराव उंडे, उपसरपंच कल्याणी गाढवे, पत्रकार विशाल चव्हाण,विजय उंडे, डॉ विठ्ठल गवते ,सुहास काकडे, उमेश सोनवणे, प्रशांत साबळे, आकाश गडीलकर , योगेश मांडे, भानुदास वाबळे तसेच “साथ” फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते तर आभार प्रदर्शन स्मितलभैय्या वाबळे यांनी केले.