पावसाळ्यामध्ये महाराष्ट्रात पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आवड असलेल्या लोकांसाठी अगणित ठिकाणे आहेत व यामध्ये प्रामुख्याने हिल स्टेशन तसेच असलेले धबधबे आणि हिरवाईने नटलेले घाटमाथे यांचा समावेश करता येईल. त्यामुळे पावसाळ्यात वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना पर्यटकांची प्रचंड प्रमाणात गर्दी होते. परंतु पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त पसंती दिली जाते ती धबधब्यांना.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सुंदर असे निसर्गाने समृद्ध असलेले धबधबे असून दररोजच्या ताणतणावाच्या जीवनापासून मनाला थोडीशी शांतता लाभावी आणि निसर्गाच्या सानिध्यात काही काळ घालवता यावा याकरिता अनेक पर्यटक अशा ठिकाणांना भेटू देतात.
याचप्रमाणे तुमची देखील या पावसाळ्यामध्ये एखाद्या धबधब्याला भेट द्यायची इच्छा असेल तर तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या राजापुरी तालुक्यातील चुनाकोळवण येथील सवतकडा धबधब्याला भेट देऊ शकतात. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी प्रचंड प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असते. या धबधब्यासोबतच तुम्हाला पावसाळ्यामध्ये दमदार पाऊस झाला तर दुथडी थोड्या भरून वाहणाऱ्या नद्यांचे दर्शन देखील घेता येते.
रत्नागिरी जिल्ह्यातील सवतकडा धबधबा आहे निसर्गाचे समृद्ध खाण
रत्नागिरी जिल्ह्यातील सवतकडा धबधबा हा राजापूर तालुक्यातील चुना कोळवण या गावामध्ये आहे. चूनाकोळवण या गावातील सुतारवाडी येथे हा धबधबा असून पावसाळ्यात या ठिकाणी खूप गर्दी असते. सवतकडा धबधब्याचे उंच कड्यावरून ओसंडून वाहणारे पाणी पाहण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी येतात. त्यामुळे तुम्हाला देखील या ठिकाणी भेट द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता.
या धबधब्याचे पाणी 100 मीटर पेक्षा जास्त उंचीवरून खाली कोसळते व उंचावरून पडणाऱ्या या पावसाच्या पाण्याचे रूपांतर अगदी छोट्या छोट्या थेंबांमध्ये होते ही छोटी थेंबे जेव्हा आपल्या अंगावर येतात तेव्हा मनाला खूप शांतता लाभते. जर तुम्ही या धबधब्याला भेट दिली तर तुमच्या मनातील ताणतणाव तसेच थकवा चुटकीसरशी गायब होतो.
तुम्हाला जर सवतकडा धबधब्याला जायचे असेल व स्वतःच्या कारने येत असाल तर रत्नागिरी शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. म्हणजेच मुंबई ते गोवा महामार्गावरून प्रवास करत असताना ओणी शहरापासून साधारणपणे एकोणावीस किलोमीटर अंतरावर चुनाकोळवण हे गाव आहे व या गावापासून या धबधब्याकडे जाता येते.
जेव्हा तुम्ही या मार्गाने सवतकडा धबधबा कडे जाल तेव्हा तुम्हाला रस्त्यात अनेक छोटी-मोठी झरे पाहायला मिळतात व ही झरे पाहून देखील मनाला अतिशय आनंद मिळतो.
रेल्वेने कसे जाता येईल?
समजा तुम्ही रेल्वेने गेलात व रत्नागिरी रेल्वे स्टेशनला उतरला तर त्या ठिकाणहून सवतकडा धबधबा 56 ते 58 किलोमीटरच्या आसपास आहे. रत्नागिरी रेल्वे स्टेशन वरून तुम्ही बस किंवा स्वतःच्या वाहनाने देखील जाऊ शकतात. परंतु राजापूर रेल्वे स्टेशनला उतरला तर हे अंतर फक्त 26 किलोमीटर पर्यंत आहे. रत्नागिरी रेल्वे स्टेशनला उतरला तर तुम्ही महामार्गाला येऊन एसटीच्या माध्यमातून सवतकडा धबधब्याला येऊ शकता.
मुक्कामी राहायचे असेल तर शेरलीन मोंटा रिसॉर्ट आहे फायद्याचा
तुम्हाला जर या ठिकाणी मुक्काम करायचा असेल व निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर या रिसॉर्टला तुम्ही थांबू शकतात.
या रिसॉर्ट पासून सवतकडा धबधबा 12 किलोमीटर अंतरावर आहे व या ठिकाणी तुमची राहण्याची व जेवण्याची व्यवस्था अप्रतिम स्वरूपात होऊ शकते. शिवाय तुम्हाला त्या ठिकाणी अनेकछोटे मोठे वडापाव किंवा इतर खाद्यपदार्थांची स्टॉल्स उपलब्ध असून या माध्यमातून तुम्ही नाश्त्याचा किंवा चटपटीत खाण्याचा आनंद घेऊ शकतात व त्यासोबत निसर्ग पाहू शकता.