शाळा होणार सुरु …मुख्यमंत्री म्हणाले ‘त्या’ पालकांनी मुलांना शाळेत पाठवू नये…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची योग्य खबरदारी घेऊन राज्यातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिले. व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

या वेळी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, राज्यामंत्री बच्चू कडू, अपर मुख्य सचिव वंदना क्रिष्णा आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, जागतिक परिस्थिती बघता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दिवाळीनंतर पुढचे काही दिवस अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. ज्या शाळांत क्वाॅरंटाइन सेंटर्स तयार केली होती ती बंद करता येणार नाहीत. अशा शाळा पर्यायी जागेत सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा.

शाळांचे सॅनिटायझेशन, शिक्षकांची कोरोना तपासणी आदी बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. जे मूल किवा ज्या घरातील व्यक्ती आजारी आहे अशा पाल्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24