देशात व्हॅक्सीन आल्याशिवाय शाळा, महाविद्यालय उघडू नये; शिक्षक संघटनेचे मुख्यमंत्र्याना पत्र

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- राज्यासह जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचे संक्रमण सुरूच आहे. यातच अनेक दिवसांपासून बंद असलेले शाळा कॉलेज कधी सुरु होणार याबाबत चर्चा सुरु होत्या.

नुकतीच शिक्षणमंत्र्यांनी शाळा कधी सुरु होणार याबाबत माहिती जरी केली होती. मात्र आता एवढ्यातच शाळा सुरु करण्यास शिक्षक संघटटनेकडून विरोध केला जात आहे. कोरोनाची लस समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत शाळा महाविद्यालय सुरु करण्याचा प्रयत्न करु नये,

अशी मागणी महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक फाऊंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब गोतारणे व सचिव बाजीराव सुपे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. इतर राज्यांत शाळा सुरु करण्याबाबत घाईघाईत निर्णय घेऊन शाळा सुरु करण्यात आल्या पण कोरोना प्रादुर्भाव होऊन रुग्णसंख्येत वाढ झाल्याने परत शाळा बंद करण्यात आल्या.

आज इतर देशांतही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्याचे धाडस आजची परिस्थिती पहाता करु शकत नाहीत. राज्यातील शाळांमध्ये 50 टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहण्याबाबत मार्गदर्शक सूचना देणारा 29 ऑक्टोबरचा सरकार निर्णय संदिग्ध व अनाकलनीय गोंधळ निर्माण करणारा आहे.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये शिक्षक शिक्षकेतरांना प्रवेश देण्यापूर्वी शाळांचे निर्जंतुकीकरण करणे, हँडवॉश, सॅनिटायझर उपलब्ध करून देणे, सहा फुट अंतर ठेवणे, 3 ते 4 तासानंतर सॅनिटायझेशन करणे, शाळेत प्रवेश करतांना थरमल स्कॅनरने तापमान तपासणे, अध्यापन साहित्य,

संगणक, लॅपटॉप, प्रिंटर या उपकरणांचे 70 टक्के अल्कोहोल वाईफने निर्जंतुकीकरण इत्यादी बाबींचा समावेश केला आहे. या संपूर्ण व्यवस्थेसाठी शैक्षणिक संस्थाना किमान 25 हजार ते एक लाखापर्यंत खर्च येणार आहे. त्याची कोणतीही आर्थिक मदत सरकारने जाहीर केलेली नाही. विद्यार्थी व शिक्षक यांचा संरक्षणासाठी विमा उतरविण्यात यावा.

आर्थिकदृष्ट्या तरतुद करण्यात यावी. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीच्या प्रमुखांची परवानगी न घेता शाळा सुरु करणे म्हणजे लहान मुलांच्या आयुष्याशी खेळ केल्यासारखे होईल. जनतेच्या मनात असंतोष निर्माण होईल, सरकारने घाईघाईत विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना व्हॅक्सीन दिल्याशिवाय बोलावू नये.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24