कोरोनाच्या सावटाखाली जिल्ह्यात शाळा सुरु

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-राज्यात करोनाची साथ आटोक्यात असल्याने पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. जिल्ह्यात पाचवी ते आठवीपर्यंत 2 हजार 3 शाळा असून त्यापैकी 1 हजार 769 शाळा सुरू झाल्या आहे.

3 लाख 7 हजार 777 विद्यार्थी पैकी 98 हजार 937 विद्यार्थ्यांनी शाळेच्या दुसर्‍या दिवशी हजरी लावली. राज्य सरकार व आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे जिल्ह्यातील बहुतेक शाळा पालन करताना दिसत होत्या.

काही शाळांनी विद्यालयाच्या प्रवेशद्वारातच विद्यार्थ्यांच्या शरीराचे तापमान व शरीरातील ऑक्सीजन मोजण्याची व्यवस्था केली होती. हात सॅनिटाईज करण्याचे कामही प्रवेशद्वारातच सुरु होते.

दरम्यान प्रत्येक विद्यार्थ्यांला पालकांचे संमतीपत्र बंधनकारक करण्यात आले होते. आतापर्यंत 1 लाख2 हजार 769 पालकांनी संमती पत्रे दिले असल्याचे जिल्हा परीषदेच्या शिक्षण विभागाने सांगितले.

शिक्षक व कर्मचाऱ्यांची तपासणी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली आहे. आतापर्यंत 5 हजार 392 शिक्षकांची करोना चाचणी पूर्ण झाली आहे. यात 19 शिक्षक हे करोना बाधित आढळून आलेले आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24