Second Hand CNG Car : देशात पेट्रोल- डिझेलनंतर आता लोक CNG कार मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. CNG कार तुम्हाला दररोजच्या प्रवासाला खूप परवडणाऱ्या असतात. यामुळे तुमचे खूप पैसे वाचतात.
अशा वेळी लोक कमी बजेटमुळे सेकंड हँड सीएनजी कार खरेदी करत असतात. मात्र जर तुम्हीही सेकंड हँड सीएनजी कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी…
नीट तपासा
सेकंड हँड सीएनजी कार घेण्यापूर्वी ती नीट तपासा. कारमध्ये कुठेही गॅस गळती होत नाही याची खात्री करा. तुम्हाला कारमध्ये काही अडचण दिसली, तर मेकॅनिककडून तपासणी करूनच ती खरेदी करा. सेकंड हँड कार घेण्यापूर्वी त्याची टेस्ट ड्राईव्ह करा.
फॅक्टरी फिट सीएनजी कार खरेदी करा
सेकंड हँड सीएनजी कार खरेदी करताना, कार फॅक्टरी फिट असल्याची खात्री करा. अनेकजण त्यांच्या पेट्रोल कारमध्ये बाहेरून सीएनजी किट बसवून घेतात. अशा कार सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण नाहीत.
फॅक्टरी फिटेड सीएनजी कार या बाहेरच्या बाजूने फिट सीएनजी कारपेक्षा चांगल्या आहेत. कंपनी आपली CNG कार पेट्रोल इंजिनसह विकते. दुसरीकडे, बाहेरून बसवलेल्या सीएनजी किटमध्ये कोणतेही मानक नाही.
इंजिन मायलेज आणि CNG टँकबद्दल जाणून घ्या
सेकंड हँड सीएनजी कार खरेदी करताना तिचे इंजिन कंडिशन, मायलेज आणि सीएनजी टँकची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. खरेदी करण्यापूर्वी, कार किती चालविली आहे आणि तिच्या इंजिनमध्ये काही दोष आहे का ते पहा.
तुम्हाला काही चूक दिसली तर मेकॅनिककडून तपासून घ्या. त्याच्या मायलेजबद्दल देखील जाणून घ्या. असे होऊ नये की सेकंड हँड कार घेतल्यावर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. खरेदी करण्यापूर्वी, एकदा हे देखील तपासा की सीएनजी कारच्या टाकीमध्ये गळतीची समस्या आहे का. असल्यास तुम्ही यावर विचार करायला हवा.