अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- नवरात्रीच्या कार्यक्रमाची सांगता करताना अण्णा हजारे बोलताना म्हणाले होते कि, गावाच्या रोजच्या कामात लक्ष घालणे हळूहळू कमी करत आहे, यामुळे हजारे निवृत्त होणार असल्याची चर्चा पसरली होती.
दरम्यान हे वृत्त प्रसिध्द् होताच राज्यासह देशभरातील प्रसार माध्यमे व कार्यकर्त्यांत मोठी खळबळ उडाली. दिवसभर कार्यालयातील फोन वाजू लागला.
शेवटी मंगळवारी सांयकाळी अण्णांनी खुलासा केला की, ‘मी कसला निवृत्त होतो. आणि निवृत्त होऊन काय करणार? शरीरात प्राण असेपर्यंत समाजकार्य करतच रहाणार आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या गैरहजेरीत गावातील मंडळीनी खुप चांगल्या पद्धतीने राळेगण मध्ये विकास कामे केली. ते पाहून खुप समाधान वाटले म्हणून म्हटले यापुढे मी गावातून थोडे लक्ष्य कमी करतो.
तुम्ही गावकरी खुप चांगले काम करत आहात. राळेगण परिवारातील कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याचा उद्देश आहे, निवृत्ती वगरे काही नाही असेेही अण्णा म्हणाले. अण्णांच्या या खुलाशाने कार्यकर्त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved