महाराष्ट्र

ज्येष्ठसमाजसेवक अण्णा हजारे देखील जाणार अयोध्येला

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : अनेक वर्षापासून श्री राम जन्मभूमी आयोध्या येथे नियोजित असणारे राम मंदिर व प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना प्रतीक्षेत होती. त्या ऐतिहासिक सुवर्णक्षणाची प्रतीक्षा आता संपली असून

अयोध्या येथे प्रभू रामचंद्र यांच्या भव्य मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे. व प्रभु श्रीरामांच्या भव्य मुर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा मुहर्त २२ जानेवारी रोजी होत आहे.

अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना देण्यात आले आहे. पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांनी या सोहळ्यासाठी जाण्याबाबत सकारात्मक संदेश दिला आहे. त्यामुळे या मंगलकारी सोहळ्याचे हजारे साक्षीदार होणार आहेत.

नाशिक विभागातून सामाजिक कामे करणाऱ्या १० नामवंतांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्यात हजारे यांच्यासह पद्मश्री पोपटराव पवार यांचाही समावेश आहे. यावेळी अहमदनगरचे राष्ट्रीय स्वयं सेवकसंघाचे संघचालक डॉ.रवींद्र साताळकर व नाशिक विभागाचे संपर्क प्रमुख घनश्याम दोडिया,

नगर दक्षिणचे जिल्हा सह संपर्क प्रमुख कैलास गाडीलकर, दत्ता आवारी, श्याम पठाडे, शिल्पा गाडीलकर आदी उपस्थित होते. श्री राम मंदिर न्यास ट्रस्टतर्फे श्री रामप्रभू यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे अधिकृत निमंत्रण डॉ. साताळकर व दोडिया यांच्या हस्ते हजारे यांना

राळेगणसिद्धी येथे देण्यात आले. यावेळी हजारे यांनी निमंत्रण मिळाल्याबद्दल न्यासाचे आभारही मानले. प्रवास खूप लांबचा आहे. प्रकृती व्यवस्थित असेल, तर मी सोहळ्यासाठी जाईल, असेही आण्णा हजारे यांनी या वेळी सांगीतले.

Ahmednagarlive24 Office