अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील भाजपच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे.
बुथ प्रमुखांच्या मताला कवडीचीही किमत न देता श्रीरामपूर शहर व तालुका मंडलाच्या अध्यक्ष पदाच्या नियुक्त्या केल्याच्या निषेधार्थ सर्व बुथ प्रमुखांनी राजीनामे दिल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
जिल्हाध्यक्ष गोंदकर यांच्याबाबत श्रीरामपुरात रोष दिसून आला. या निवडीच्या निषेधार्थ या मतदार संघातील 231 बुथ प्रमुखांपैकी 213 बुथ प्रमुख तसेच 44 शक्ती केंद्र प्रमुख अशा एकूण 257 प्रमुखांनी आपल्या पदाचे सामुहिक राजीनामे दिले.
हे सर्व राजीनामे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविले आहेत. शहर व तालुक्यातील उपस्थित बुथ प्रमुखांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला आणि राजीनामे दिल्याची घोषणा केली.
काल येथील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. काळे झेंडे हाती घेऊन निषेध करत त्यावेळी राजीनामे देण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी नगरसेवक किरण लुणिया, राजेंद्र चव्हाण, नगरसेवक रवी पाटील, अभिजित कुलकर्णी, राजेंद्र पाटणी, बाबासाहेब हिवराळे, प्रणव भारत, संजय यादव,
गणेश भिसे, सोमनाथ पतंगे, सचिन पारेख, नारायण पिंजारी, सोमनाथ कदम, सुरेश आसने, शेखर आहेर आदी उपस्थित होते. सर्व कार्यकर्त्यांनी दंडावर काळ्या फिती लावून निषेध केला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved