अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- लग्नात केलेले दागिने मोडल्यानंतर ते पत्नीस परत घेऊन देता आले नाही. त्यामुळे दांपत्यात सातत्याने वाद सुरू होते. या वादाचे पर्यवसन थेट सात वर्षाच्या निष्पाप मुलीचा खुनापर्यंत पोहोचले.
सततच्या वादामुळे संतापात असलेल्या पित्याने सात वर्षीय मुलीचे अपहरण करून दारूच्या नशेत गळा आवळून तिचा खून केल्याची घटना गुरुवारी जळगाव जिल्ह्यात उघडकीस आली.
स्वत: आत्महत्या करणार असल्याचे मॅसेज आरोपीने पत्नीसह काही जणांना पाठवले होते. परंतू, आत्महत्या केली नाही. त्याला गुरुवारी दुपारी १२ वाजता पारोळा येथून अटक करण्यात आली.
कोमल उर्फ परी संदीप चौधरी (७, रा.हिरागौरी पार्क) असे मृत चिमुरडीचे नाव आहे. संदीप यादवराव चौधरी (३३) असे आरोपी बापाचे नाव आहे.
बुधवारी सायंकाळी कोमलची आई नयना यांनी कोमलला क्लासमध्ये सोडले. यानंतर संदीपने क्लासमध्ये जाऊन मुलीला नेले. कोमलला तिचे वडील घेऊन गेल्याची माहिती नयना यांना मिळाली.
सकाळी संदीपने शरद ऑटोच्या मालकास मॅसेज करून आपण ‘मुलीचा खून केला असून तिचा मृतदेह बांभोरी पुलाखाली आहे.
आता मी स्वत: देखील आत्महत्या करणार आहे. मी पारोळा येथे आहे’ असा मजकूर मॅसेजमध्ये लिहीला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.