महाराष्ट्र

Shakti Peeth Expressway: शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला येणार वेग,12 जिल्ह्यांसाठी 27 भूसंपादन अधिकाऱ्यांची नेमणूक! जाणून घ्या माहिती

Published by
Ajay Patil

Shakti Peeth Expressway:- येणाऱ्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात काही महत्त्वाच्या महामार्गाची कामे सुरू होणार असून त्यासाठीच्या आवश्यक प्रक्रिया सध्या पूर्ण केल्या जात आहेत. अशा या महामार्गामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील कनेक्टिव्हिटी वाढण्यासाठी मदत होईलच परंतु वेगवान प्रवास देखील शक्य होणार आहे.

अनेक मोठमोठे शहरांमधील प्रवास अगदी काही तासात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. एवढेच नाहीतर कृषी आणि औद्योगिक क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून देखील होऊ घातलेले हे महामार्ग महत्त्वाचे ठरणार आहेत.

या अनुषंगाने नागपूर ते गोवा हा ८०२ किमी लांबीचा महामार्ग महत्त्वाचा असून नुकतीच राज्य सरकारच्या माध्यमातून या महामार्गाच्या अंतिम आखणीला मान्यता देण्यात आलेली होती

व पुढील प्रक्रिया म्हणून आता या महामार्गासाठी आवश्यक जमिनीच्या संपादनासाठी  अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली असून भूसंपादनाची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होण्याची शक्यता आहे.

 शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी 27 भूसंपादन अधिकाऱ्यांची नेमणूक

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये सुरुवात होण्याची शक्यता असून राज्य सरकारने भूसंपादनाकरिता 12 जिल्ह्यांमध्ये 27 भूसंपादन अधिकाऱ्यांची नेमणूक देखील केलेली आहे.

त्यामुळे या वर्षाखेपर्यंत हा महामार्ग उभारण्याकरिता आवश्यक निविदा प्रक्रिया देखील सुरू करण्याच्या उद्देशाने एमएसआरडीसी कडून आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. तसेच या महामार्गाच्या अंतिम आखणीला राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिलेली होती व आता भूसंपादन अधिकाऱ्यांची नेमणूक करून राज्य सरकारच्या माध्यमातून

या महामार्गाच्या उभारणीसाठी महत्वाचे पाऊल टाकण्यात आलेले आहे. जर आपण शक्तीपीठ महामार्गाचा विचार केला तर बारा जिल्ह्यातील एकोणावीस धार्मिक स्थळे

जोडण्याचा राज्य सरकारचा या माध्यमातून प्रयत्न आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून आता भूसंपादन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्यामुळे या महामार्गाच्या प्रत्यक्ष भूसंपादनाला आता सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 कसे आहे शक्तीपीठ महामार्गाचे स्वरूप?

हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवणार येथून सुरू होणार असून गोवा सीमेवर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी या ठिकाणी संपणार आहे. तसेच राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली,

कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यांना जोडण्यामध्

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नागपूर ते गोवा हा प्रवास पूर्ण करण्यासाठी साधारणपणे सध्या 21 तास लागतात. परंतु जेव्हा हा महामार्ग पूर्ण होईल तेव्हा नागपूर ते गोवा हा प्रवास 21 तासांऐवजी फक्त 11 तासात पूर्ण करता येणार आहे.
Ajay Patil