विखे परिवार भाजपवासी झाल्याने जि.प अध्यक्ष शालिनी विखे यांनी राजीनामा द्यावा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

संगमनेर :- विखे परिवार भाजपवासी झाल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ यांनी केली.

विखे काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या असल्याने जिल्हा परिषद सदस्यत्व आणि अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली.

नगर जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. काँग्रेस श्रेष्ठींच्या आदेशाने अध्यक्षपदाची माळ

भाजपचे नवे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांची पत्नी व भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांच्या मातु:श्री शालिनी विखे यांच्या गळ्यात पडली होती.

त्यावेळी पक्षातील अनेक निष्ठावंतांना डावलत त्यांची वर्णी लावण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्कारावेळी शालिनी या मंत्री विखे यांच्यासमवेत होत्या.

याचाच अर्थ त्यादेखील पती आणि पुत्रासोबत भाजपमध्ये गेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शालिनी विखे राहाता तालुक्यातून काँग्रेसची उमेदवारी करत विजयी झाल्या.

त्यांना काँग्रेसने अध्यक्षपदाची संधी दिली. आता विखे परिवार काँग्रेससोबत नसल्याने शालिनी विखे यांनी राजीनामा द्यावा,

अशी मागणी ओहोळ यांनी काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24