नेवासे : माजी आ. शंकरराव गडाख यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत ‘क्रांतिकारी’ पक्षाकडूनच निवडणूक लढणार असल्याची घोषणा आज कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केली
यावेळी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख उपस्थित होते, विशेष म्हणजे युवा नेते प्रशांत गडाख मांडवाबाहेर कार्यकर्त्यांसमवेत बसले होते.
यावेळी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाखांनी ‘राजकीय पळापळ’ करणार्यांची खिल्ली उडवली, तसेच वरुन किर्तन आतून तमाशा न करण्याचं आवाहनही केलं.
गडाख हे तालुक्याला लागलेली किड असेल पण तुम्ही तर डेरेदार झाडाला लागलेलं बांडगूळ आहात! तुम्ही तालुक्यात किंवा स्वत:च्या देवगावात एक तरी शाळा काढली का?
अरे तुमच्यापेक्षा आमच्या गावातली ‘बंग मॅडम’ कर्तबगार आहे असे बोलत ज्येष्ठ नेते गडाख यांनी आ. मुरकुटेंचा खरपूस समाचार घेतला.
यावेळी गडाख परिवाराला मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.