अटक करून घेण्यासाठी शंकरराव गडाख एसपी कार्यालयात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नगर : कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी शनिवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस यशवंतनगर परिसरातील माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या बंगल्यात गेले होते. दोन तास थांबूनही गडाख तेथे मिळाले नाही. 

त्यामुळे पोलिसांनी अटक वॉरंटचा अहवाल कोर्टाला पाठवला. तर रविवारी दुपारी बाराच्या सुमारास शंकरराव गडाख स्वत:हून पोलिस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले. आपल्याला अटक करा, असा आग्रह त्यांनी गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे धरला.

मात्र, आज आमच्याकडे वॉरंट नसल्याचे उत्तर पोलिसांनी त्यांना दिले. गडाख दोन तास तेथेच बसून राहिले व नंतर निघून गेले. 

नेवासे तालुक्याचे माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नावे नेवासे कोर्टाने अटक वॉरंट बजावले. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी शनिवारी दुपारी गडाखांच्या सोनई व नगरमधील घराची झडती घेतली

पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार व त्यांच्या टीमने ही कारवाई केली.

गडाख यांनी २०१७ मध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नगर औरंगाबाद महामार्गावरील वडाळा येथे रास्तारोको आंदोलन केले होते. याप्रकरणी गडाख यांच्यासह सुमारे ४० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. 

कोर्टाने अटकेचे वारंट काढताच पोलिसांनी गडाखांच्या शोधासाठी त्यांच्या घराची झडती घेतली. 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24