अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे वयाची 81 वर्ष पूर्ण होत आहे. (Sharad Pawar Birthday)
कोरोना असल्यामुळे शरद पवार कुणाकडूनही प्रत्यक्ष शुभेच्छा स्वीकारणार नाहीत. ‘व्हर्च्युअल रॅली’च्या माध्यमातूनच ते संवाद साधणार आहेत.
त्यामुळे 12 डिसेंबर रोजी त्यांना भेटण्यासाठी कुणीही येऊ नये, असं आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे.
ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल रॅली ही मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत कोरोना नियमांचे पालन करुन रविवार 12 डिसेंबर रोजी नेहरु सेंटर वरळी येथे सकाळी 11 ते 1 या वेळेत पार पडणार आहे.
वाढदिवसानिमित्त होणारी ही अभूतपूर्व व्हर्च्युअल रॅली पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेज व युट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.