अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- मंत्रिमंडळ विस्तारात नगर जिल्ह्याचा विचार वेगळ्या पद्धतीने केला आहे. जिल्ह्यातील ज्या मतदारसंघाला अद्याप संधी मिळाली नाही याचा अभ्यास केला असता राहुरी मोकळे दिसले, म्हणुन राहुरीला संधी दिली.
जिल्ह्यात नवी पिढी पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्रिमंडळात राज्यमंत्री कमी असल्याने त्यांना कामही खूप देणार असून किमान पाच ते सहा खात्याची जबाबदारी राहणार असल्याची प्रतिक्रीया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला दिली.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे अहमदनगर येथे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात जिल्ह्याच्या उत्तर भागातील मतदारसंघातील प्रतिनिधींना संधी दिली? या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले, मला उत्तर-दक्षिण माहित नाही. मात्र मी मंत्रीपदासाठी नगर जिल्ह्याचा विचार वेगळ्या पद्धतीने केला आहे.
जिल्ह्याच्या इतर मतदारसंघाची माहिती घेतली असता अकोले, कोपरगाव, राहाता, श्रीगोंदा, नगर, कर्जत-जामखेड या मतदारसंघाच्या प्रतिनिधींना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली.
यामुळे याचा अभ्यास करताना राहुरी मोकळे दिसल्याने मंत्रिमंडळात संधी मिळाली. जिल्ह्यात नवी पिढी पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे.
मंत्रिमंडळात राज्यमंत्र्यांची संख्या कमी कामही खूप देणार आहोत. यामुळे त्यांना किमान पाच ते सहा खात्यांची जबाबदारी राहणार असल्याचे स्पष्ट केले.