अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : सध्या महाराष्ट्रात विकास आघाडीचे सरकार आहे. या सरकारसमोर आरक्षणाबत अनेक निर्णय घेण्याचे आवाहन आहे. या प्रश्नांवरुनच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधला आहे.
धनगर समाजाच्या आरक्षणावरून ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, असं माझं मत आहे. अशी जहरी टीका त्यांनी केली.
पुढे बोलताना पडळकर म्हणाले शरद पवार असं व्यक्तिमत्व आहे की त्यांकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. छोट्या छोट्या समूह घटकांना भडकवायचं, त्यांना आपल्या बाजूला करायचं आणि त्यांच्यावरच अन्याय करण्याची त्यांची भूमिका आहे.
मागील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं धनगरांसाठी पॅकेज जाहीर केलं होतं. मात्र विश्वासघातामुळे सरकार पडल्यानं त्यावर कार्यवाही होऊ शकली नाही. पण या सरकारनं त्या पॅकेजमधील एक रुपयादेखील दिला नाही.
तसेच राज्य सरकार वेगवेगळ्या समाजांच्या बाबतीत वेगवेगळी भूमिका घेत आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाची केसदेखील न्यायालयात सुरू आहे. त्यासाठी मात्र सरकार दखल घेत नाही अशी टीका पडळकर यांनी केली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews