पुणे : महात्मा फुले यांच्याबरोबर सर्व जाती-धर्माचे लोक काम करीत होते, कारण सत्य हीच त्यांची जात होती आणि सत्य हाच त्यांचा धर्म होता.
खुद्द शरद पवार यांचे आई-वडीलदेखील सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते आणि त्यामुळेच शरद पवार यांनीदेखील जातीधर्माचा भेद बाजूला सारून समाजकारण आणि राजकारण केले.
त्यांच्यामुळेच माझा राजकीय पुनर्जन्म झाला, असे मत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
पुण्यातील फुलेवाडा येथे आयोजित समता दिन कार्यक्रमात भुजबळ बोलत होते. यावेळी छगन भुजबळ यांच्या हस्ते ज्येष्ठ लेखक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यावेळी भुजबळ बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ समीक्षक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, पंकज भुजबळ, प्रा. हरी नरके, ज्येष्ठ उद्योजक दीपक कुदळे, माजी आमदार कमल ढोले-पाटील, सुनील सरदार, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापुसाहेब भुजबळ, प्रदेशाध्यक्षा मंजिरी धाडगे, विभागीय अध्यक्ष प्रीतेश गवळी, लीला सबनीस, प्रा.रतनलाल सोनाग्रा आदी मान्यवर उपस्थित होते.