महाराष्ट्र

NCP News : शरद पवार हे घर चालवतात, तसे पक्ष चालवत होते …

Published by
Ahmednagarlive24 Office

NCP News : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेची पूर्णपणे पायमल्ली करण्यात आली, असा जोरदार युक्तिवाद अजित पवार गटाने सोमवारी निवडणूक आयोगापुढे केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून काका शरद पवार आणि पुतणे अजित पवार यांच्यात निर्माण झालेला वाद केंद्रीय निवडणूक आयोगापुढे पोहोचला आहे. आयोगापुढे सोमवारी या प्रकरणाची दुसरी सुनावणी झाली.

अजित पवार गटाचे वकील एन. के. कौल यांनी सोमवारी बाजू मांडली. यानंतर मनिंदर सिंग आणि सिद्धार्थ भटनागर हेसुद्धा अजित पवार गटाकडून बाजू मांडणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाचे म्हणणे दुसऱ्या दिवशी ऐकून घेतले.

यापूर्वी, शुक्रवारी पहिली सुनावणी झाली होती. शरद पवार हे घर चालवतात, तसे पक्ष चालवत होते, असा आरोप अजित पवार गटाने केला आहे. महत्त्वाचे म्हणजे, शरद पवार यांची अध्यक्षपदी निवड करताना राकाँच्या घटनेतील तरतुदींची पूर्णपणे पायमल्ली करण्यात आल्याचे सांगितले आहे.

पक्षाच्या अंतर्गत कामात लोकशाहीचा अभाव असल्याचं सांगत एकच व्यक्ती पक्षावर अधिकार गाजवू शकत नाही, राष्ट्रवादीमध्ये हेच सुरू होतं असा आरोप अजित पवार गटाने केला.

महाराष्ट्र विधानसभेचे 53 पैकी 42, विधानपरिषदेचे 9 पैकी 6 आणि नागालँडमध्ये 7 पैकी 7 असे 55 आमच्या पाठिशी, तर लोकसभेत 5 पैकी 1 आणि राज्यसभेतील 4 पैकी 1 खासदार आमच्यासोबत आहेत आहेत असा दावा गेल्या सुनावणीच्या वेळी अजित पवार गटाकडून करण्यात आला होता

Ahmednagarlive24 Office