शरद पवार म्हणाले आमच्या सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून कै.माजी आमदार यशवंतराव भांगरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व शेतकरी मेळाव्यासाठी शरद पवार यांचे अकोले तालुक्यात मुरशेत येथे सकाळी 9.35 वाजताच दाखल झाले होते.

एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं आहे, असा टोला शरद पवार यांनी त्यांचे एकेकाळचे सहकारी मधुकर पिचड यांना लागवला आहे.

माजी आमदार कै. यशवंत भांगरे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यशवंत भांगरे माझ्या अगोदर ५ वर्ष अगोदर विधानसभेत होते. ते मला ज्येष्ठ होते.

अकोले तालुक्यात अनेक महत्वाच्या संस्था उभारणीत भांगरे याचा मोठा सहभाग होता, असं पवार म्हणाले. अकोले तालुक्यातील जनतेने परिवर्तन करत आम्हाला साथ दिली आणि ती अशीच पुढेही द्यावी, असं आवाहन शरद पवार यांनी केले.

या भागातील सर्व नेते एकजुटीने सोबत आले. मी सर्व गोष्टी केल्या मात्र एक दीड वर्षापासून आमच्या‌ अनेक सहका-यांच्या अंगात यायला लागलं, असा टोला शरद पवार यांनी पिचड यांना लगावला.

दरम्यान आज सकाळी पवार यांचे ९ वाजताच अकोल्यात आगमन झाले होते .सर्वप्रथम त्यांनी मुरशेत गावची पाहणी केली. यावेळी त्यांचे सोबत पालकमंत्री हसन मुश्रीफ, आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ डॉ किरण लहामटे, ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे, युवा नेते अमित भांगरे, आदि उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24