‘एवढी’ आहे शरद पवारांची संपत्ती, सहा वर्षांत झाली इतकी ‘वाढ’ आणि ‘इतक्या’ रुपयांचे कर्ज …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी महाराष्ट्रातून माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

यावेळी त्यांनी जोडलेल्या शपथपत्रात आपल्या संपत्तीचाही उल्लेख केला आहे.यावरून पवारांच्या संपत्तीत झालेली वाढ दिसून आली.

शरद पवार  यांची संपत्ती गेल्या सहा वर्षांत ६० लाखांनी वाढल्याचं दिसतं, त्यांनी दाखल केलेल्या संपत्ती विवरण पत्रानुसार शरद पवार यांची संपत्ती ३२.७३ कोटी रुपये एवढी आहे.

शपथपत्रात शरद पवार यांनी आपली ३२.७३ करोड रुपयांची एकूण मिळकत जाहीर केली आहे. यामध्ये २५,२१,३३,३२९ रुपयांची जंगम आणि २,५२,३३,९४१ रुपयांच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे.

२०१४ च्या राज्यसभा निवडणुकीदरम्यान दाखल केलेल्या शपथपत्रात पवारांनी २०,४७,९९,९७०.४१ रुपयांची जंगम मालमत्ता आणि ११,६५,१६,२९० रुपयांची स्थावर मालमत्ता अशी मिळून ३२.१३ कोटींची संपत्ती जाहीर केली होती.

या शपथपत्रात  दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांच्यावर 1 कोटी रुपयांचे कर्जही आहे. तर, पत्नी प्रतिभा पवार यांना अडव्हान्स डिपॉझिट म्हणून ५० लाख रुपये मिळाल्याचेही या शपथपत्रात सांगण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24