‘ती’ गुटखा कारवाई संशयाच्या भोवऱ्यात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून शहरात अवैध मालाची वाहतूक होत असल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या.

गुटखा, पानमसाला आदींचे टेम्पो काही अधिकाऱ्यांच्या मेहेरबाणीवर जिल्ह्यातून खुलेआम प्रवास करत आहे. नुकतीच याबाबत वर्तमान पत्रांमध्ये बातम्या झळकू लागल्या होत्या.

या अनुषंगाने श्रीरामपूर तालुक्यात पोलीस पथकाने आक्रमक करत लाखोंचा गुटखा घेऊन जाणारा टेम्पो ताब्यात घेतला.पोलिसांच्या या कारवाईचे मोठे कौतुक झाले.

मात्र आता हीच कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील एकलहरे शिवारातील आठवाडी परिसरातील अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांच्या

मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी राहुल मदने व पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या पथकाने मंगळवारी छापा टाकत लाखोंचा गुटखा,

पानमसाला जप्त केला.आता पोलीस प्रशासनाची हि कारवाई संशयाच्या भोवर्‍यात आली असून, या गुटखा छाप्यातील गुलाबाच्या बागेच्या मालकाला पोलीस प्रशासन वाचविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

पोलिसांनी या गुटखा छाप्यातील ठिकाणच्या जागेशी गुन्ह्यातील आरोपीचा काहीही संबंध नसलेल्या एका पंटरवर गुन्हा दाखल केला असून,

ज्या ठिकाणी हा अवैध व्यवसाय चालू होता त्या पत्र्याचे शेड व जागा मालक याची संपूर्ण सखोल चौकशी करून संबंधित गुटखा किंगवर गुन्हा दाखल करणे आवश्यक होते, मात्र पोलिसांनी केवळ पंटरवर गुन्हा दाखल केला आहे,

त्याचा एकलहरे कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीची जागा नाही त्याला गावांत कोणीही ओळखत नाही, पोलिसांनी ज्या ठिकाणी छापा टाकला होता त्या ठिकाणच्या जागेचे उतारे तपासून मूळ मालकाचा शोध घेणे गरजेचे होते,

त्यानुसार कारवाई आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. तालुक्यातील आतापर्यंतची गुटखा प्रकरणाची पोलिसांनी केलीली इतक्या मोठ्या कारवाईत पोलिसांनी गुलाबाच्या बागेला जाणूनबुजून दुर्लक्ष केले का ?

एकलहरेच्या अस्सल गुटखा किंगला पोलिस जाणूनबुजून दुर्लक्ष करीत तर नाही ना ? अशा चर्चेला जिल्ह्यात उधाण आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24