अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :-प्रेमात एकमेकांसाठी वाटेल ते करण्याची तयारी प्रेमवीरांची असते. प्रेमात विश्वास हाच एकमेक धागा असतो. मात्र, एखाद्या वेळी विश्वासघात देखील होतो.
अशीच घटना आझमगडमध्ये घडली आहे. प्रियकरावर विश्वास ठेवणे प्रियेसीच्या जिवावर बेतलं आहे. जिल्ह्यातील मुबारकपूर पोलीस स्टेशन परिसरातील संशयास्पद परिस्थितीत बेपत्ता युवतीचा मृतदेह शाळेच्या मागे सापडल्याने खळबळ उडाली आहे. संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी आझमगड-बलिया रस्ता रोखून धरला होता.
मुबारकपूर पोलीस स्टेशन परिसरातील तलावात युवतीचा मृतदेह सापडला होता. तिने प्रियकरासोबत तलावात उडी घेतली होती. शेवटच्या क्षणी प्रियकराने विचार बदलला आणि तो पोहत बाहेर पडला.
त्याने प्रेयसीला वाचवण्याचा प्रयत्न केला पण यशस्वी होऊ शकला नाही. त्यानंतर तो पळून गेला आणि कप्तानगंज परिसरातील आपल्या घरी गेला. दुसर्याच दिवशी वडिलांनी आणि चुलतभावांनी त्याच्याविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले. मयत युवतीच्या घराशेजारी हा युवक राहत होता.
त्याचे आणि युवतीचे प्रेमसंबंध जुळाले याची माहिती कुटुंबीयांना मिळताच त्यांनी दोघांवर बाहेर जाण्यास बंदी घातली. कुटुंबीयांनी एके दिवशी दोघांना पकडले व त्यांना मारहाण केली. कुटुंबातील सदस्यांच्या रोजच्या अडवण्यामुळे दोघंही त्रस्त झाले होते.
शनिवारी रात्री दोघेही अचानक गायब झाले. प्रियकराच्या म्हणण्यानुसार, दोघांनीही एकमेकांशिवाय जगू न शकल्याने मरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शाळेजवळील तलाव गाठले. मरण्यापूर्वी प्रियकराने प्रेयसीच्या कपाळाला सिंदूर लावले. मग त्या दोघांनीही तलावात उडी घेतली.
तेवढ्यात प्रियकराचा विचार बदलला अन् त्याने प्रेयसीला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु ती वाचली नाही. त्यानंतर तो स्वत: पोहच बाहेर आला आणि तेथून पळ काढत घर गाठले.
युवती बेपत्ता झाल्याने तिच्या घरातील नातेवाईक जमा झाले, त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यांनी मुलीला गायब करण्यामागे प्रियकर असल्याचा संशय व्यक्त केला. पोलिसांना प्रियकराला ताब्यात घेतल्यानंतर त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved