Sheetal Mhatre : धक्कादायक! शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा मॉर्फ व्हिडीओ व्हायरल..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sheetal Mhatre : मुंबईतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत सामील झाले होते. या रॅलीतील शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा व्हिडीओ मॉर्फ करून त्यावर अश्लील मजकूर करून व्हायरल करण्यात आला आहे. 

यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे दहिसर पोलिस स्टेशनमध्ये मोठा राडा बघायला मिळाला. याबाबत पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे. याबाबत आता तपास सुरू करण्यात आला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक जमले होते.

दरम्यान, विनयभंगासारखा गुन्हा दाखल करून असे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना अद्दल घडवावी, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. अज्ञात व्यक्तींनी रॅलीतील हा व्हिडीओ एडीट केला आहे. तसेच तो व्हायरल देखील केला आहे.

शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांच्या या व्हिडीओमध्ये अश्लील मजकूर लिहून तो व्हायरल करण्यात आला. या व्हायरल व्हिडीओची माहिती मिळताच शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे. शिवसैनिकांनी दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तात्काळ तक्रार नोंदवली.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपींचा शोधही सुरू केला आहे. याबाबत एका आरोपीला अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू केला आहे. शीतल म्हात्रे यांनी मातोश्री नावाच्या पेजवर हा व्हिडिओ मॉर्फ करून घाणेरडा मजकूर लिहून व्हायरल केल्याचा आरोप केला आहे.

रात्रभर शिवसैनिकांनी दहिसर पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ अपलोड करून व्हायरल केल्याचं सांगत या प्रकरणी विनयभंगासारखा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली.