शेवगाव :- शहरात आज सकाळी मोर्चा काढून “पाकिस्तान मुर्दाबाद.. शहीद जवान अमर रहे… पाकिस्तानला ठेचून काढा… हिंदुस्तान हम शरमिंदा है, हमारे जवानोंके कातील अभी जिंदा है..”अशा घोषणा देऊन सर्वसामान्य जनतेने आपला तिव्र संताप व्यक्त केला.
मोर्च्याची सांगता शिवाजी चौकात सभा घेऊन करण्यात आली. या मोर्च्यामधे शेवगाव येथील अनेक मुस्लीम बांधवांनी भाग घेतला. सर्वप्रथम शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. या मोठ्या संकटांमधे सर्व लोक जवानांच्या पारीवारासोबत बरोबर असून त्यांनी आपल्या संवेदना प्रकट केल्या.
या वेळी शेवगाव शहरातील सर्व धर्माचे व सर्व पक्षांचे लोक सहभागी झाले होते. या वेळी उपस्थित मुस्लीम बांधवांनी झालेल्या घटनेबद्दल प्रचंड राग व्यक्त केला. “आम्हांला या मोदी सरकार कडून एका शहीद जवानाच्या बदल्यात दुश्मनांची 1000 कापलेली मुंडकी पहिजेत.
दुश्मनांना असा धडा शिकवा की परत भारताकडे त्यांची नजर उचलून बघायची हिम्मत झाली नाही पाहिजे” अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. जवान हा प्रत्येकाच्या मनात रहात असतो. आम्हाला आमच्या जवानांचा सार्थ अभिमान आहे पण आज झालेल्या घटनेने प्रत्येकाच्या दुखत्या नसेवर बोट ठेवले आहे
त्यामुळे केंद्र सरकारने त्वरीत कारवाई करून झालेल्या घटनेचा बदला घ्यावा. देशामधल्या तसेच देशाबाहेरच्या शत्रूला कायमची अद्दल घडवावी. यामधे संपुर्ण देश, सर्व विरोधीपक्ष व सर्व जनता आपल्या बरोबर आहे असा सरकारला पाठिंबा देण्यात आला.