शिर्डी ब्रेकिंग : साईबाबा मंदिर आजपासून रहाणार बंद !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम / शिर्डी :- कोरोना व्हायरसच्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाय म्हणून राज्यातील प्रमुख देवस्थान भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शिर्डितील साईबाबा मंदिर, कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदीर, शेगाव येथील गजानन महाराज मंदिर, जेजुरी येथील खंडोबा मंदिर भक्तांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आज सायंकाळपासून साई मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. भाविकांना मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी पुजाऱ्याच्या माध्यमातून पूजा, अर्चा नेहमीप्रमाणे सुरू असतील. 

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रामनवमी निमित्त शिर्डीत पायी पालखी आणणाऱ्यांनी यावर्षी येणे टाळावे तसेच शिर्डीत मंदिर परीसरात गर्दिही टाळावी, असे आवाहन साईबाबा संस्थान कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे यांनी केले आहे.

आज दुपारी तीन नंतर जनसंपर्क व बायोमेट्रिकचे पासेस देणे बंद करण्यात येईल, त्यानंतर पास घेतलेल्या भाविकांचे पाच वाजेपर्यंत दर्शन होऊन हे भाविक बाहेर पडतील. सायंकाळच्या धुपारतीला आज केवळ पुजारी असतील असा निर्णय होऊ शकतो,

संस्थानची रुग्णालये मात्र सुरू राहतील. या ठिकाणी रुग्णांव्यतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी प्रशासन कठोर पावले उचलू शकते, केवळ ठराविक वेळीच बाहेरच्या लोकांना रुग्णांची भेट घेता येईल, सध्या रुग्णांना चोवीस तास भेटण्याची मुभा आहे.

दरम्यान रविवारी होणारी मोठी गर्दी घटली असून अत्यल्प गर्दीमुळे दर्शन रांगा ओस पडलेल्या दिसून आल्या. यामुळे शिर्डीच्या अर्थकारणाला कोट्यवधीचा फटका बसत आहे. दिवसाला दोन कोटीहून अधिकची होणारी ऊलाढाल चाळीस पन्नास लाखावर खाली आली आहे. 

जगभरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे, भारतात ही प्रादुर्भाव वाढू लागला आहे हा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून काही निर्देश देण्यात आले आहेत. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24