बेकायदेशीर दारु विक्री पोलिसांनी पकडल्याने महिलेने केले ‘हे’ कृत्य…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

शिर्डी – शिडींतील गुंडगिरी व अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई सुरु केली आहे.

शिर्डी परिसरात बेकायदेशीर दारु विक्री होत असल्याची गुप्त खबर मिळाल्यावरुन काल रात्री 8:05 च्या सुमारास सौंदडी बाबा मंदिराजवळ कालिकानगर भागात छापा टाकला.

या ठिकाणी पोलिसांनी भिंगरी दारुच्या बाटल्या, किंगफिशर दारुच्या बाटल्या, फ्रिजमध्ये असल्याच्या स्थितीत पकडल्या.

पोलीस छापा टाकून कारवाई करत असताना तेथे असलेली आरोपी महिला जया प्रविण आल्हाट हिने मोठ मोठ्याने आरडाओरडा करुन फ्रिजच्या वायरने आत्महत्येचा प्रयत्न केला.

तेव्हा महिला पोलिसांनी तिला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले , व तीला ताब्यात घेतले. या ठिकाणी झडती घेतली असता दारु बिअरच्या बाटल्यांसह धारदार हत्यारही मिळून आले.

पोसई वंदना अशोक सोनुने (शिर्डी पो. स्टे.) यांच्या फिर्यादीवरुन आरोपी जया प्रविण आल्हाट, प्रविण उर्फ भाऊसाहेब पोपट आल्हाट दोघे रा. सौंदडीबाबा मंदिराजवळ, कालिकानगर शिर्डी

यांच्याविरुद्ध भादवि कलम ३०९, भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24