अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मंत्रिमंडळ विस्तारानंतर अवघ्या पाचच दिवसात शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांना मोठा धक्का बसला आहे औरंगाबाद येथील शिवसेना नेते व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला आहे.
आज संध्याक पर्यंत खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, अशातच त्यांचा राजीनामा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यानं त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. आपल्याला कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द देण्यात आल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं होते.
औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदावरुन अब्दुल सत्तार गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर कमालीचे नाराज होते. या नाराजीतूनच सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलाय.
ज्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून अब्दुल सत्तार सातत्याने निवडून येतात, त्या मतदारसंघात मुस्लिम समाजाची निर्णायक मते आहेत. या मतांना सोबत घेऊन इतर समाजाचा विश्वास संपादन करुन अब्दुल सत्तार हे सातत्याने विधानसभेवर निवडून जात.
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसची साथ सोडून अब्दुल सत्तार शिवसेनेत आले होते. सत्तार यांनी औरंगाबादमधील सिल्लोड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली.
दरम्यान आमदार असलेल्या अब्दुल सत्तार यांनी अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणूनही काम केलं होतं.
सुरुवातीला विलासराव देशमुख आणि त्यानंतर अशोक चव्हाण आणि शेवटी शेवटी राधाकृष्ण विखे पाटील समर्थक म्हणून त्यांची ओळख होती.
हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : सावेडीत हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या अड्डाच्या पर्दाफाश