शिवसेना उपजिल्हाप्रमुखांनी केंद्रीय संरक्षणमंत्र्यांकडे केली ही मागणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :-  सध्या जिल्ह्यातील के.के.रेंज प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. या प्रकरणामध्ये जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह राज्यातील नेतेमंडळी देखील लक्ष देऊन आहे.याच पार्शवभूमीवर आता शिवसेनेनं देखील याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.

जिल्ह्यातील राहुरी, पारनेर व नगर तालुक्यातील लष्कराच्या प्रस्तावित के. के. रेंज क्षेत्राच्या अधिग्रहणबाबत केंद्रीय संरक्षण विभागाने भूमिका जाहीर करून या संदर्भात परिपत्रक काढून शेतकर्‍यांना दिलासा देण्याची मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे.

या मागणीचे निवेदन त्यांना मेलवर पाठविण्यात आल्याचे लहामगे यांनी सांगितले. नगर, पारनेर व राहुरी तालुका हद्दीचा समाविष्ट असलेल्या नगरजवळील लष्कराच्या के. के. रेंज या युद्ध प्रशिक्षण व सराव क्षेत्राच्या विस्तारीकरणाच्या हालचाली सुरूच आहेत. याबाबत अद्यपर्यंत संरक्षण विभागाकडून काहीच स्पष्ट करण्यात आलेले नाही.

तसेच के.के. रेंज 2 चा विचार वरिष्ठ पातळीवरून सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. ज्या-ज्या वेळी विस्तारीकरणाचा मुद्दा पुढे येतो, त्या वेळी नगर, राहुरी व पारनेर तालुक्यातील शेतकरी धास्तावून जातात. करण के. के. रेंज परिसरात नगर, राहुरी व पारनेर तालुक्यांतील 23 गावांतील क्षेत्राचे अधिग्रहण केले जाणार असल्याची चर्चा होते.

जमीन अधिग्रहणला तीनही तालुक्यातील शेतकर्‍यांचा तीव्र विरोध असल्याने सध्या हा विषय संवेदनशील बनला आहे. युद्धसराव क्षेत्रासाठी आता शेतकर्‍यांची जमीन अधिग्रहित करू नये अशीच सर्वांची इच्छा आहे. प्रशासनाच्या पातळीवरून मात्र याबाबत अधिकृतरित्या शेतकर्‍यांना काहीच माहिती दिली जात नाही.

त्यामुळे शेतकरी संभ्रमात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. के.के. रेंज संदर्भात आता थेट केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाने भूमिका जाहीर करून परिपत्रक काढावे व नगर, राहुरी व पारनेर तालुक्यातील शेतकर्‍यांना दिलासा देण्याची मागणी शवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री यांच्याकडे केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24