अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या आशिर्वादामुळे महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार आले आहे.आज शिवसेनाप्रमुख जरी आपल्यात नसले तरी त्यांचे विचार सर्वांना सतत प्रेरणा देणार आहे,असे प्रतिपादन शिवसेनेचे शहर प्रमुख नितीन जगताप यांनी केले.
येथील नगर पंचायत चौकात आयोजित स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त शहर प्रमुख नितीन जगताप बोलत होते.या कार्यक्रमास जिल्हा शिवसेना नेते रामदास गोल्हार, अंबादास लष्करे, युवासेनेचे महेश गरुटे, अक्षय दाणे, सागर शिंदे, सचिन कदम आदी मान्यवरांनी स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .
पुढे बोलताना जगताप म्हणाले, सर्व सामान्य मराठी माणसाला न्याय देण्याचे व मोठे करण्याचे काम ठाकरेंनी केले. वडापाव विकणारा , मंडीत भाजीपाला विक्री करणारा, पान टपरी चालक,पावभाजी विकणारा अशा अनेक छोटया व्यवसायिकांना त्यांनी पाठबळ दिले.
सामाजिक काम करणाऱ्यांची जात,धर्म न पाहता त्यांना त्यांचे काम पाहून आमदार, खासदार ,मंत्री व मुख्यमंत्री बनवले. बाळासाहेब ठाकरेंच्या प्रत्येक श्वासात हिंदुत्व होते. ज्या-ज्या वेळी मराठी माणसावर व हिंदु धर्मावर अन्याय झाला त्या-त्या वेळी स्व. बाळासाहेब ठाकरेंनी आवाज उठवला. आजही शिवसेना प्रमुखांचे विचार प्रेरणा देणारे व उर्जा देणारे आहेत.