खडसेंच्या प्रवेशाबाबत शिवसेना नेत्याने केले विधान…राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षावर नाराज आहेत. खडसे भाजपला रामराम ठोकण्याच्या तयारीत असून ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशा चर्चा सुरु होत्या.

या चर्चा सुरु असतानाच आता शिवसेनेच्या एका नेत्याने केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश करणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आता फक्त मुहूर्त ठरवायचा आहे.

असे असतानाच शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर म्हणाले कि खडसे शिवसेनेतही येऊ शकतात! माजी मंत्री खोतकर हे आज नगरमध्ये आलेले होते.

यावेळी खोतकर यांना खडसे शिवसेनेत येतील का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना खोतकर म्हणाले की, हा निर्णय शेवटी त्यांचा आहे.

आपण काही म्हणलो तरी निर्णय त्यांना घ्यायचा आहे असे खोतकर म्हणाले. तसेच एकनाथ खडसे भाजप सोडतील का ? असा प्रश्न विचारल्यावर खोतकर म्हणाले, खडसे यांचे भाजप मध्ये आता काय राहिलंय ?

जवळपास ते भाजपातून बाजूलाच पडले आहेत. त्यांना त्यांचे चांगले वाईट समजते. म्हणून ते योग्य पक्षातच जातील असे खोतकर म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24