Maharashtra news:विधानसभा अध्यक्ष निवड आणि बहुतम चाचणीच्यावेळी शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांनी एकमेकांविरूद्ध केलेल्या व्हिप मोडल्याच्या तक्रारींची विधिमंडळ सचिवालयाने दखल घेतली आहे.
दोन्ही बांजूच्या मिळून ५३ आमदारांना ही नोटीस पाठविण्यात आली आहे. आमदार आदित्य ठाकरे यांना मात्र ही नोटीस पाठविण्यात आलेली नाही.विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांनी नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये ७ दिवसांमध्ये उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शिवसेना आणि शिंदे गटाने एकमेकांना व्हीप बजावला होता. आपलाच पक्ष खरा असल्याचा दावा एकमेकांनी केला होता, आता या संदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे.या संदर्भात सुप्रीम कोर्टात ११ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
मात्र त्याआधी विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी ही नोटीस बजावली आहे. त्यामुळे हाही एक राजकीय आणि कायदेशीर डापवेचाच एक भाग असल्याचे मानले जात आहे. यावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आहे.
आदित्य ठाकरेंना ही नोटीस देण्यात आली नाही. विधानसभा अध्यक्षपद निवडणूक आणि त्यानंतर झालेला विश्वासदर्शक ठराव या दोन्हीसाठी ठाकरे आणि शिंदे गटातर्फे व्हीप बजावण्यात आला. आदित्य ठाकरेंही विश्वासदर्शक ठरावावेळी सभागृहाबाहेर होते. मात्र त्यांना ही नोटीस देण्यात आली नाही.