मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत भाजप (Bjp) नेते मोहित कंबोज (mohit kamboj) यांच्या गाडीवर हल्ला झाल्याप्रकरणी शिवसेनेला (Shivsena) चांगलेच सुनावले आहे. तसेच जमावाने कसा हल्ला केला त्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दरेकर यांनी यावेळी आमच्या शेपटावर पाय ठेवून आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर भाजप स्वस्थ बसणार नाही. उद्या या अॅक्शनला रिअॅक्शन झालं. तर भाजपही टीट फॉर टॅट करू शकते, असे म्हणत या हल्ल्याचा निषेध केला आहे.
दरेकर म्हणाले, राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. मोहित कंबोज हे सार्वजनिक रस्त्यावरून जात होते. त्यावेळी त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. मागे काँग्रेसचे (Congress) कार्यकर्ते फडणवीसांच्या घरी आंदोलन करण्यासाठी जात होते.
त्यावेळी त्यांना एक दोन किलोमीटर अंतरावर बॅरिकेड लावून रोखलं गेलं. पण राणांच्या घरापर्यंत जायला शिवसैनिकांना मुभा दिली. ज्या पक्षाचं सरकार आहे.
त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांदेखत गुंडगिरी सुरू आहे. सरकार पुरस्कृत कधीच एवढी गुंडगिरी, दहशत झाली नाही, असे दरेकर म्हणाले आहेत.
तसेच शिवसेनेचे नेते या दहशतीचं समर्थन करत आहेत. आगीत तेल ओतत आहेत. अशा प्रकारचं समर्थन करणार असाल, आणखी आक्रमक होऊन हल्ला करण्याचं धमकावत असाल तर समोरचे कार्यकर्ते हात बांधून बसलेले नाहीत.
मधमाश्यांच्या पोळावर दगड मारल्यावर कुठे कुठे माशा बसतात ते माहीत आहे. भाजपचे कार्यकर्ते संघर्षशील कार्यकर्ते आहेत. आमचा इतिहास संघर्षाचा आहे. थोडे कार्यकर्ते असतानाही भाजपने संघर्ष केला आहे, असेही प्रवीण दरेकर यावेळी बोलताना म्हणाले आहेत.