शिवसेनेचा बँकांना इशारा; सक्तीची वसुलीला ब्रेक लावा अन्यथा…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- बँका, खासगी पतसंस्था व खासगी फायनान्स कंपन्यांकडून होणारी सक्तीची वसुली व जप्तीची कार्यवाही तत्काळ थांबवावी अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

तसेच यावेळी संगमनेर येथील शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने तहसीलदार यांना निवदेन देण्यात आले. दिलेल्या निवेदनातून दिला.

बँकांच्या मोठ्या कर्जांच्या थकबाकीची प्रभावीपणे व परिणामकारक वसुलीच्या उद्देशाने आर्थिक मालमत्तेचे तारणीकरण, पुनर्गठण तारणांवरील हक्काच्या अंमलबजावणीसाठी सरफेसी अ‍ॅक्ट कायदा २००२ अस्तित्वात आला. कायद्यात केंद्राने २००४ मध्ये अधिक प्रभावी बदल करून देशातील सर्वच बँकांना लागू केला.

या कायद्याचा आधार घेऊन बँक कर्मचारी, अधिकारी थकीत कर्जदार,नातेवाईक व जामीनदार यांना चुकीची भाषा वापरेन अवमानकारक वागणूक देत मानसिक त्रास देतात. यातून अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. संकटकाळात शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार बँकांनी वसुली करावी.

खातेदार अथवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या जीवितास काही झाल्यास मृत्यूनंतर पोलिस दप्तरी आकस्मात मृत्यू म्हणून नोंद न घेता, त्याला जबाबदार असणारे बँक व्यवस्थापक, कर्मचारी, नेमलेले प्रतिनिधी तसेच तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांना जबाबदार धरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

बँकाच्या सक्तीच्या वसुलीबाबत प्रशासन उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी, उपतालुका प्रमुख रमेश काळे, रंगनाथ फटांगरे आदींनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला. नायब तहसीलदार सुभाष कदम यांनी निवेदन स्वीकारले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24