शिवाजी’ या तीन अक्षरी शब्‍दांनीच मला जगण्‍याचीउमेद दिली – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम:- ‘शिवाजी’ या तीन अक्षरी शब्‍दांनीच मला जगण्‍याची उमेद दिली. ध्‍येयाने वेडी झालेली माणसेच इतिहास निर्माण करतात याचा प्रत्‍यय महाराजांच्‍या जीवनाकडे पाहील्‍यानंतर येतो. स्‍वराज्‍य स्‍थापनेच्‍या संपुर्ण वाटचालीत नगर जिल्‍ह्यातील भुमिपुत्रांनी बजावलेल्‍या भुमिकांच्‍या आठवणींना महाराष्‍ट्र भुषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी उजाळा दिला.

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : सावेडीत हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या अड्डाच्या पर्दाफाश

निमित्‍त होते लोणी येथे सदिच्‍छा भेटीचे. महाराष्‍ट्र भुषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लोणी, प्रवरानगर येथे सदिच्‍छा भेट दिली. प्रवरानगर येथे लोकनेते पद्मभुषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या स्‍मृतीस्‍थळाचे दर्शन घेवून अभिवादन केले. प्रवरा परिवाराच्‍या वतीने माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी पुरंदरे यांचा कृतज्ञतापुर्वक सत्‍कार केला.

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : डोक्यात दगड टाकून तरुणाचा खून

प्रवरेच्‍या भुमित तुम्‍ही आलात याचा आम्‍हाला अभिमान असल्‍याचे आ.विखे पाटील म्‍हणाले. या भेटी दरम्‍यान झालेल्‍या संवादातुन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी विखे पाटील परिवाराच्‍या पाचव्‍या पिढीचे काम पाहाता आल्‍याचे समाधान व्‍यक्‍त केले. पद्मश्री असताना आपण या भागात येवून गेल्‍याची आठवनही त्‍यांनी आवर्जुन सांगितली.

हे पण वाचा :- कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नगर मध्ये येत शंकरराव गडाख यांनी केले हे काम !

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्राच्‍या प्रति आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांना भेट म्‍हणुन दिल्‍या. शिवाजी महाराजांच्‍या स्‍वराज्‍य स्‍थापनेच्‍या ध्‍यायाला नगर जिल्‍ह्यातील भुमिपुत्रांनी मोलाची साथ दिली. शिवचरित्रात नगरच्‍या भुमिचा असलेला उल्‍लेख त्‍यांनी दाखल्‍यांसह या संवादातुन बोलुन दाखविला.

हे पण वाचा :- नगरच्या युवक- युवतींना चिंता फक्त जोडीदाराची,करिअरपेक्षा रिलेशनशीपला अधिक महत्व 

नेताजी पालकर, नेवासे येथील परमानंद गोविंद नेवासकर आणि नगर तालुक्‍यातील मेहेकरी गावाचा शिवचरित्रात असलेला उल्‍लेख हा इतिहास जागविणारा आहे असेही त्‍यांनी शेवटी सांगितले. राहुरी तालुक्‍यातील प्रतिपंढरपुर म्‍हणुन ओळखल्‍या जाणा-या श्रीक्षेत्र ताहाराबाद येथील संत महीपती महाराजांच्‍या समाधीस्‍थळाचीही पुरंदरे यांनी आवठन काढली. या ठिकाणी आपण भेट दिली होती असे त्‍यांनी नमुद केले.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24