धक्कादायक! पोलीस कर्मचाऱ्यास जाळून मारण्याचा प्रयत्न

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

संचारबंदीच्या काळात कर्तव्य बजावत असताना झालेल्या वादातून पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. त्यास मारहाण करत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

सायंकाळी माळशिरस तालुक्यातील मळोली गावाजवळ हा प्रकार घडला. मारहाण केल्यानंतर या आरोपीने थेट गाडीतील पेट्रोलची बाटली काढून या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर ओतून त्याला पेटवून देण्याचा प्रयत्न केला.

याची फिर्याद पोलीस कर्मचाऱ्याने वेळापूर पोलिसात दिली आहे. यावेळी जवळ असलेले काही नागरिकांनी या पोलिसाला यातून सुखरुप वाचवून पोलीस स्टेशनपर्यंत आणलं.

पोलिसांनी याची गंभीर दाखल घेत आरोपीला अटक करत त्याच्यावर प्राणघातक हल्ला व सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून वेळापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24