धक्कादायक! साठ वर्षीय महिलेवर बलात्काराचा प्रयत्न; या ठिकाणी घडली घटना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :-  देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवरून आधीच संतापाची लाट उसळली आहे. एकीकडे महिलांच्या रक्षणासाठी आंदोलन रॅलीचे आयोजन केले जात आहे.

तर दुसरीकडे अशा घटना अद्यापही सुरूच आहे. श्रीगोंदा तालुययातील पुई फाट्याजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये काम करणार्‍या वेटरकडून दि. 12 ऑक्टोबर रोजी रात्री 11 चे सुमारास मद्यपान करून

शेजारी राहणार्‍या 60 वर्षीय महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. महिला सपरासमोर बाज टाकून त्यावर झोपलेली असताना त्यांच्या जवळ एक इसम आला.

त्याने पीडित महिला झोपेत असताना तोंड दाबल्याने त्यांना जाग आली. महिलेने प्रतिकार केला असता तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी आरोपीने देत पीडितेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर लगेच पीडितेने घडलेला सर्व प्रकार नातेवाईकांना सांगितल्यानंतर आरोपीचा शोध घेणे सुरू केले. पीडितेच्या कुटुंबीयांनी जवळील हॉटेलमध्ये चौकशी केली असता त्यांना तिथे आरोपी आढळून आला.

पीडितेच्या कुटुंबीयांकडून आरोपीस पकडण्याचा प्रयत्न केला असता अंधाराचा फायदा घेऊन तो पळून गेला. नातेवाईकांसोबत महिलेने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात येऊन हॉटेलमधील वेटरविरोधात फिर्याद दिली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24