धक्कादायक! पुण्यातून आलात, मग गावात ‘नो एंट्री’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पुणे सध्या लॉक डाऊनमध्ये अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या मूळ गावी सॊडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. परंतु पुण्यातील बिहारी मजुरांवर वेगळेच संकट आले आहे. ते पुण्यात असल्याने त्यांना त्यांच्या राज्याने प्रवेश नाकारला आहे.

पुणे विभागातून विविध राज्यांत आतापर्यंत ६८ हजार ५५३ प्रवासी रेल्वेने रवाना झाले आहेत. त्यासाठी १७ मे पर्यंत एकूण ५३ रेल्वे धावल्या आहेत.

मात्र, यात पुणे स्थानकातून बिहार राज्यासाठी एकही रेल्वे धावली नसल्याची बाब समोर आली. बिहारच्या राज्य सरकारने पुण्यातून येणाऱ्यांना ‘रेड सिग्नल’ दाखविल्याने गाड्या सोडण्यात येत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पुण्यासह राज्यातील श्रमिकांत उत्तरप्रदेश आणि बिहारमधील नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यानुसार राज्यातून उत्तर प्रदेशसाठी जवळपास ८०हून अधिक ट्रेन धावल्या आहेत.

पुण्यातून श्रमिक पाठविण्यासाठी बिहार राज्य सरकारकडे २४ प्रस्ताव पाठविले असून, ते प्रलंबित आहेत.

पुणे विभागातून मध्य प्रदेशासाठी १५, उत्तर प्रदेशासाठी २४, राजस्थानसाठी पाच, बिहारसाठी सहा आणि उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि तमिळनाडूसाठी प्रत्येकी एक अशा गाड्यांचा समावेश आहे.

अहमदनगर लाईव्ह 24