धक्कादायक! ससूनमध्ये दिला जातोय दहा दिवस होण्यापूर्वीच डिस्चार्ज

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-पुणे : केंद्र सरकारने मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात डिस्चार्च प्रोटोकॉल बदलला आहे. या नवीन प्रोटोकॉलनुसार सौम्य लक्षणे असलेले किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांना सलग तीन दिवस ताप किंवा अन्य लक्षणे नसल्यास दहा दिवसांनी घरी सोडणे अपेक्षित आहे.

परंतु ससून रुग्णालयातून पाच दिवसांतच रुग्ण बरे होऊन घरी जाऊ लागले आहेत. रुग्णालयात दाखल होण्यापुर्वी लक्षणे सुरू झाल्याच्या दिवसापासून पुढील दहा दिवसांचा कालावधी डिस्चार्जसाठी ग्राह्य धरला जात आहे.

दरम्यान, काही खासगी रुग्णालयांकडूनही रुग्णालयात दहा दिवस होण्यापुर्वीच घरी सोडण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागातील सुत्रांनी दिली. केंद्राच्या नवीन प्रोटोकॉलमुळे घरी सोडण्यात येणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे.

ससून रुग्णालयामध्ये सुरूवातीला या प्रोटोकॉलनुसार रुग्णालयात दहा दिवस पुर्ण झाल्यानंतर रुग्णांना घरी सोडले जात होते. पण मागील काही दिवसांपासून हा प्रोटोकॉल बदलण्यात आल्याचे दिसते.

महापालिका तसेच काही खासगी रुग्णालयांमध्येही रुग्णालयात दहा दिवस पुर्ण झाल्यानंतरही घरी सोडण्यात येत आहे.

ससून रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २५ मे रोजी दोन प्रसुती झालेल्या महिलांना रुग्णालयात दाखल झाल्यानंतरच्या सातव्या दिवशी तर एका प्रसुती झालेल्या महिलेला सहाव्या दिवशी तसेच दि. २९ मे रोजी आणखी एका प्रसुती झालेल्या महिलेला पाचव्या दिवशीच घरी सोडण्यात आले. इतर काही रुग्णांनाही सहा ते नऊ दिवसांत घरी सोडण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24