धक्कादायक ! ‘आरटीई’च्या ऑनलाइन अर्जात इंग्रजी शाळाच नाही, अफवा व संभ्रम यांत अडकली आरटीई प्रवेश प्रक्रिया

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारानुसार आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करताना दहा शाळांची निवड करायची आहे. मात्र, अर्ज भरताना दहामध्ये एकही इंग्लिश मीडियम स्कूलचे नाव येत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आरटीईमधून विद्यार्थ्यांना चांगल्या व खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये प्रवेश मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मधील आरटीई प्रवेशांसाठी शिक्षण हक्क कायद्यात सुधारणा केली. त्यानुसार एक किलोमीटरच्या परिघात महापालिकेची शाळा असेल तर त्याच शाळेत प्रवेश घ्यावा लागणार आहे. त्यानुसार खासगी शाळांऐवजी प्राधान्याने शासकीय आणि अनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

शासकीय आणि अनुदानित शाळा उपलब्ध नसलेल्या भागातच खासगी शाळेत प्रवेश घेता येणार आहे. मात्र, अर्ज करताना निवडायच्या शाळांमध्ये एकही इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा समावेश नसल्याचे समोर आल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पालक पडलेत गोंधळात
खासगी शाळांचे शुल्क मोठ्या प्रमाणात असते. त्यातच आरटीईमुळे वंचित घटकांतील मुलांना दिलासा मिळत होता. मात्र, आता ऑनलाइन अर्ज भरताना फक्त मराठी शाळांचा समावेश दिसून येत आहे.

इंग्रजी माध्यमांची एकही शाळा उपलब्ध नाही. जर मराठी शाळेतच आरटीईमधून प्रवेश मिळत असेल तर त्यापेक्षा सरळ मराठी शाळेत प्रवेश घेणे सोयीचे ठरेल. आरटीईमध्ये अर्ज करून पैसे खर्च करण्यात अर्थच काय, असा प्रश्न पालक करत आहेत.

अफवा व संभ्रम यांत अडकली आरटीई प्रवेश प्रक्रिया
आरटीई प्रवेश प्रक्रिया तस पाहिले तर दरवर्षी साधारण नोव्हेंबर डिसेंबर महिन्यातच सुरू होत असते. परंतु यंदा तर ती बंदच झाल्याची अफवा सुरवातीला पसरवली गेली. त्यानंतर मार्च एप्रिलमध्ये आरटीईसाठी नवी नियमावली घोषित करण्यात आली.

या नियमावलीनुसार खासगी शाळांऐवजी प्राधान्याने शासकीय आणि अनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्याचे ठरवण्यात आले. शासकीय आणि अनुदानित शाळा उपलब्ध नसलेल्या भागातच खासगी शाळेत प्रवेश घेता येणार असल्याचा निर्णय घेण्यात आलात पण आता तर इंग्रजी शाळाच दिसत नसल्याने गोंधळाचे वातावरण आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe