अहमदनगर जिल्ह्यातील त्या सेक्स रॅकेट बद्दल धक्कादायक माहिती समोर !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यामध्ये सेक्स रॅकेट करणारी टोळी सध्या सक्रीय झालेली असून वेश्याव्यवसायातून मिळणाऱ्या पैशावर मजा लुटणारे लुटेरे पुढे येत आहेत.

कोरोनाच्या काळामध्ये हॉटेल आणि लॉजिंग व्यवसाय बंद ठेवण्यात आल्यामुळे सुखसोयीनी परिपूर्ण असलेल्या हॉटेल लॉजऐवजी घरगुती वेश्याव्यवसायच सुरक्षित वाटू लागल्याने अवैध वेश्याव्यवसाय करणाऱ्या टोळ्या समोर येत आहे.

श्रीगोंदा शहरातील उच्चभ्रू वसाहतीतील खाजगी बंगल्यामध्ये खुलेआम सुरू असलेल्या घरगुती सेक्स रॅकेटचा श्रीगोंदा पोलिसांनी पर्दाफाश केला

एका ४८ वर्षीय महिला घरमालक आणि एक युवकाला ताब्यात घेण्यात आले असून दोघांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा शहरातील स्टेशन रोड रस्ता परिसरातील उच्चभ्रू वसाहतीतील एका खाजगी बंगल्यामध्ये महिला घरमालक आणि अरुण रोहीदास देवकर हे दोघेजण

एका पिडीत महिलेला अवैधरित्या वेश्याव्यवसाय करण्यास भाग पडून प्रवृत्त करुन त्यातुन मिळणारे पैशावर स्वत:ची उपजिवीका भागवुन पिडीत महिलेला वेश्या व्यवसाय करण्यासाठी कुटुंनखान्यामध्ये अडकवुन ठेवले असल्याची माहिती

एका गुप्तमाहितीदाराकडून श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना मिळाल्यानंतर त्यांनी नेमलेल्या पथकाने दि. ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास छापा टाकून या हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चा पर्दाफाश केला.

यावेळी वेश्या गमनाकरीता लागणारे साहित्य निरोध, मोबाईल आणि रोख रक्कम २५०० रुपये असा मुदेमालासह आरोपी मिळुन आल्याने एल.पी.सी. लाड यांनी दिलेल्या फिर्यादवरून अरुण रोहीदास देवकर वय- २७ वर्ष रा.बाबुर्डी रोड श्रीगोंदा

व स्टेशन रोड श्रीगोंदा येथील एक महिला घरमालक याचेविरुदध भा द वी क ३७० (३) सह स्त्रियांचे अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५,७, नुसार दाखल करण्यात आला आहे.

सदरील कारवाई श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पो. कॉ. अमोल आजबे, पो. कॉ. राजू भोर, पो. कॉ. मरकड, एलपीसी लाड यांच्या पथकाने केली

आरोपींना अटक करण्यात आली असून पीडित महिलेस न्यायालयामार्फत तिच्या नातेवाईकाकडे किंवा स्नेहाधार संस्थेकडे सुपूर्त करण्यात येणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24