अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी :- तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या एका इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनीवर वसतिगृहाचा अधीक्षक महेश प्रभाकर चाचर याने अत्याचार केल्याची घटना घडली.
या घटनेने राहुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, दि. ७ ऑक्टोबर २०१९ च्या रात्री ११ ते १२ वाजता तसेच आठ, आठ दिवसाच्या अंतराने पुन्हा दोन वेळा पीडित मुलीवर संबंधीत अधीक्षकाकडून अत्याचार झाले आहेत.
१३ वर्ष वयाच्या या मुलीच्या वसतिगृहातील खोलीत जाऊन तसेच बाथरूममध्ये ओढत नेऊन संबंधीताने तिच्यावर अत्याचार केल्याचे जबाबात म्हटले आहे. या घटनेची वाच्यता केल्यास पीडितेला जिवे मारून टाकण्याची धमकी संबंधीत नराधमाने दिली होती.
याप्रकरणी पीडित मुलीने रविवारी (दि. २९) रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास दिलेल्या जबाबावरून शाळेचा वसतिगृह अधीक्षक महेश चाचर याच्याविरुद्ध भा. दं. वि. ३५४ अ, ३५४ ब, ३७६ (२), ३७६ (२) (ब), ३७६ (२) (ड), ३७६ (२) (१), ३७६ (क), ५०६, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम ६, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व राहुरीचे निरीक्षक मुकुंद देशमुख हे घटनेच्या तपासासाठी सोमवारी दिवसभर संबंधीत शाळेत ठाण मांडून होते. या घटनेनंतर नराधम पसार झाला आहे. राहुरी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पुढील तपास पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मुकुंद देशमुख करीत आहेत. दरम्यान, बाललैंगिक अत्याचाराची घटना घडत असताना शाळा व्यवस्थापनाला कुठलाही थांगपत्ता नसल्याने शाळेतील मुलींची सुरक्षितता धोक्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकाराने पालक वर्गात संताप व्यक्त होत आहे.
हे पण वाचा : मुलगा कॅबिनेट मंत्री झाल्यावर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले …
हे पण वाचा : मंत्रीपद न मिळाल्यामुळे रोहित पवार म्हणतात….
हे पण वाचा : या कारणामुळे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद नाही मिळाले ….
हे पण वाचा : अहमदनगर ब्रेकिंग :- चाकूने भोसकून तरुणाचा खून