मुंबई : कोरोना व्हायरसचं संकट निवारण्यासाठी सध्या प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. कोरोनाची चाचणी घेताना संबंधित व्यक्तीचा फोन नंबर, पत्ता इत्यादी गोष्टी घेतल्या जातात.
परंतु काहींनी चुकीची माहिती दिल्याने ज्या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर त्याला सोधण्याचं आव्हान मुंबई महापालिका प्रशासनासमोर आहे. एकीकडे मुंबईत कोरोनाग्ररस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय.
यामुळे आधीच महापालिका प्ररशासनासमोर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं आव्हान आहे. असं असताना मुंबई महापालिका प्रशासनासमोर कोरोनाबाधित रुग्णांना शोधण्याचं मोठं आव्हान उभं राहिलंय.
तब्बल 100 हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दिलेल्या पत्त्त्यावर राहत नाहीत. तर काही स्थलांतरित झाले आहेत, तर अनेकांचे फोनही बंद आहेत. कोरोना व्हायरची चाचणी घेताना त्या व्यक्तीचा फोन नंबर, पत्ता आदी गोष्टी घेतल्या जातात.
काही जण याची खरी माहिती देत नाहीत किंवा टेस्टिंग लॅबमध्ये कर्मचाऱ्यांकडून ही माहिती भरताना चूक होते. अशावेळी तो रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्यास त्याला शोधताना नाकीनऊ येत आहेत.